अमळनेर नगरपरिषदेस नाशिक विभागात प्रथम क्रमांक – आमदार पाटील यांच्या हस्ते घरकुल लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा..

0
New-Doc-08-15-2025-23.36.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त अमळनेर शहरातील ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांना आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांनी भेट देऊन गृहप्रवेश सोहळ्यात सहभागी झाले. हेडावे रोडवरील लाभार्थी श्री. बारकु गिरधर पाटील, सौ. सुरेखा गोपाल चौधरी व श्री. अनिल भोई यांच्या घरांचे फित कापून व श्रीफळ अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी रविंद्र चव्हाण, नगर अभियंता सुनिल पाटील, डिगांबर वाघ, अजित लांडे, नगररचना सहाय्यक मयुर तोंडे, सौरभ बागड, लेखापाल सुदर्शनराज शामनानी, कृणाल कोष्टी, विद्युत अभियंता कुणाल महाले, प्रधानमंत्री आवास योजना अभियंता धीरज पाटील व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी महावितरणविषयी तक्रार मांडल्यावर आमदार पाटील यांनी त्वरित महावितरण अभियंत्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश दिले. नाशिक विभागात वैयक्तिक घरकुले पूर्ण करण्याबाबत अमळनेर नगरपरिषद प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगून आमदार पाटील यांनी नगरपरिषदेच्या कार्याचे विशेष कौतुक केले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed