जामनेर : बेटावद खुर्द मॉब लिंचिंग प्रकरणात मुख्य आरोपींना अटक व मकोका लावण्याची एकता संघटनेची मागणी; पोलिस अधीक्षक म्हणाले – एसआयटी व संगनमत कलम वाढवणार..
आबिद शेख/अमळनेर

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथे ११ ऑगस्ट रोजी झालेल्या अमानवी मॉब लिंचिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कॅफे चालक यांना अद्याप अटक न झाल्याने जनतेत संतापाची लाट आहे. जळगाव जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) आणि बीएनएस ६१(२) अंतर्गत संगनमत कलम लावण्याची मागणी केली आहे. तसेच फिर्यादीच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
निवेदन सादरीकरणावेळी पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी यावेळी एसआयटी तपास आणि संगनमत कलम वाढविण्याची कार्यवाही होणार असल्याचे सांगितले.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या
- मुख्य आरोपी व कॅफे चालक यांना तात्काळ अटक
- बीएनएस ६१(२) अंतर्गत कटकारस्थानाचा गुन्हा नोंदवणे
- मकोका तात्काळ लागू करणे
- तपास एसआयटीकडे सोपवणे
- पीडित कुटुंबाला २५ लाखांची मदत व एक सदस्यास शासकीय नोकरी
- साक्षीदार संरक्षण योजना लागू करणे
- सीआरपीसी २४(८) अंतर्गत पीडिताच्या निवडीप्रमाणे विशेष सरकारी वकील नेमणे
संघटनेचे पदाधिकारी शेख, मुफ्ती खालिद, फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगर, मजहर पठाण, आरिफ देशमुख, अब्दुल अजीम शेख, मौलाना इमरान, रज्जाक पटेल, मौलाना कासिम नदवी, खान शकील, अरबाज शेख, इरफान शेख, हसन सैयद, उमर पटेल, नजमोद्दीन शेख, गुफरान शेख आदी उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री, अल्पसंख्यांक आयोग, मानव अधिकार आयोग, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांना देण्यात आल्या.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
