अमळनेरमध्ये 900 मीटर लांबीच्या तिरंग्यासह ऐतिहासिक रॅली – देशभक्तीच्या जयघोषात शहर दुमदुमले !

आबिद शेख/अमळनेर
“हर घर तिरंगा अभियान – 2025” अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतर्फे 14 ऑगस्ट रोजी शहराच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि अविस्मरणीय तिरंगा रॅली काढण्यात आली. राज्य शासन व नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीने संपूर्ण अमळनेर देशभक्तीच्या जयघोषाने दुमदुमून निघाले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून तब्बल 900 मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजासह रॅलीची सुरुवात मा. स्मिताताई वाघ, खासदार जळगाव लोकसभा यांच्या हस्ते झाली. देशभक्तीपर गीतांच्या गजरात, विद्यार्थी, नागरिक, पदाधिकारी व अधिकारी यांच्या उस्फूर्त सहभागाने रॅली स्टेशन रोडमार्गे तिरंगा चौकापर्यंत पोहोचली. तेथे राष्ट्रगीत व राज्यगीताच्या ध्वनिफितीवर राष्ट्रध्वजास मानवंदना देत कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला.
यावेळी सर्व सहभागींस स्वच्छतेची शपथ देण्यात आली. नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
मा. स्मिताताई वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणातून सांगितले की,
“नागरिक म्हणून आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडून, तिरंग्याबद्दलची निष्ठा व देशाचा स्वाभिमान सदैव अबाधित ठेवणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर अभियंता श्री. डीगांबर वाघ व दैनिक नवराष्ट्रचे संपादक श्री. संजय पाटील यांनी केले. मुख्याधिकारी श्री. तुषार नेरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी मा. सौ. भैरवीताई वाघ-पलांडे, मा. डॉ. अनिल शिंदे, मा. नितीन मुंडावरे (उपविभागीय अधिकारी), मा. विनायक कोते (पोलीस अधीक्षक), मा. दत्तात्रय निकम (पोलीस निरीक्षक), तसेच मान्यवर पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष परिश्रम घेणारे अधिकारी व कर्मचारी –
श्री. रवींद्र चव्हाण, श्री. सुनील पाटील, श्री. अजित लांडे, श्री. कुणाल महाले, श्री. सुदर्शन शामनानी, श्री. कृणाल कोष्टी, श्री. मयूर तोंडे, श्री. सौरभ बागड, श्री. किरण खंडारे, श्री. संतोष माणिक, श्री. गणेश गोसावी, श्री. संदीप पाटील, वैद्यकीय अधिकारी श्री. विलास महाजन, श्री. प्रवीण शेलकर, श्री. महेश जोशी, श्री. लौकिक समशेर, श्री. रोहित रामोळे, श्री. कैलास कसाब, श्री. विनोद पाटील, श्री. प्रवीण बैसाणे, श्री. भाऊसाहेब सावंत, श्री. चंद्रकांत मुसळे, श्री. गणेश गढरी.
अमळनेरच्या रस्त्यावर आज एकच संदेश घुमला –
“तिरंगा आमचा अभिमान, भारत देश आमचा स्वाभिमान!” 🇮🇳
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
