अमळनेर – अवयवदान हा जीवनदानाचा अनमोल मंत्र; लायन्स क्लबकडून जनजागृती मोहीम..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – “अवयवदान – जीवनाची देणगी” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लायन्स क्लब ऑफ अमळनेरतर्फे जागतिक अवयवदान दिन (१३ ऑगस्ट) निमित्त विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे सकाळी ९ वाजता झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी अवयवदानाचे महत्त्व सांगताना उपविभागीय अधिकारी मुंडावरे म्हणाले, “अवयव स्वर्गात नेऊ नका, त्यांची गरज इथेच आहे.” त्यांनी नागरिकांना अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात लायन्स क्लब अध्यक्ष संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, मयुरी जोशी, डॉ. युसूफ पटेल, निरज अग्रवाल, प्रशांत सिंघवी, महावीर पहाडे, प्रितम मणियार, राजेश कुंदनानी, रोनक दोडीवाला यांसह असंख्य सदस्य व नागरिक उपस्थित होते.
पोस्टरचे अनावरण झाल्यानंतर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये अवयवदान जनजागृती पोस्टरचे वितरण करण्यात आले. या मोहिमेत रुग्ण व नातेवाईकांनीही सक्रिय सहभाग नोंदविला. अनेक नागरिकांनी अवयवदानाची प्रतिज्ञा करून समाजासाठी योगदान देण्याची तयारी दर्शविली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
