जामनेर हादरले: मुस्लिम तरुण सुलेमानचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू – प्रशासन आणि नेते मौनात!

0
New-Doc-08-14-2025-23.08.jpg

प्राईम न्यूज 15 Aug 2025


– जामनेर तालुक्यातील बेटावद गावात २१ वर्षीय मुस्लिम तरुण सुलेमान पठाणचा मॉब लिंचिंगच्या अमानुष घटनेत मृत्यू झाला असून, संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे सावट पसरले आहे.
घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी, ना गावचे पोलीस पाटील, ना सरपंच, ना या भागाचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी पीडित कुटुंबाला भेट दिली, ना कठोर कारवाईची हमी दिली. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभे करते.

एकता संघटनेचा तीव्र विरोध – “अरेरे, माणुसकीही जिवंत नाहीये!”

एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पीडिताच्या गावाला भेट देत, कुटुंबीयांची दोन तास भेट घेतली, सांत्वन केले आणि सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. मौलाना ओसामा यांनी कुराणाच्या प्रकाशात संयमाचे महत्त्व स्पष्ट केले, मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी “अरेरे, माणुसकीही जिवंत नाहीये…” असे उद्गार काढत प्रशासनाच्या भूमिकेवर हल्लाबोल केला.

प्रशासनावर कारवाईची मागणी – अल्पसंख्याक सुरक्षिततेचा प्रश्न

फारुख शेख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा घडू नयेत. यासाठी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांनी ठोस भूमिका घेतली पाहिजे. अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना आणि प्रयत्न झाले पाहिजेत.”

संघटनेने नागरिकांना शांतता, बंधुता आणि सामाजिक सौहार्द टिकवण्याचे आवाहन केले असून, द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या शक्तींना ठाम विरोध करण्याचे आवाहन केले.

शिष्टमंडळातील प्रमुख उपस्थिती

फारुख शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना ओसामा फलाही, मतीन पटेल, अनिस शाह, अन्वर सिकलगार, कासिम उमर, अतीक अहमद, आरिफ अजमल, कुर्बान शेख (फैजपूर), इरफान शेठ (चीनावल), अजगर शेख (सावदा), जावेद जनाब (मारुळ) यांच्यासह जावेद मुल्लाजी, अशफाक पटेल, आसिफ शेख, जुबेर शेख, शकील मुसा, उमर सय्यद (जामनेर) आदींची उपस्थिती होती.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76900/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed