अमळनेर तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेची नूतन कार्यकारणी जाहीर..

0
New-Doc-08-13-2025-19.57.jpg

आबिद शेख/अमळनेर

— अमळनेर तालुका ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 12 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. या सभेत नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

या वेळी प्रा. जितेश संदानशिव यांची तालुका अध्यक्षपदी, तर प्रा. पंकज तायडे यांची सचिवपदी निवड झाली. प्रा. शालिनी पवार (उपाध्यक्ष), प्रा. स्वप्नील भांडारकर (खजिनदार), प्रा. विलास पाटील (लेखा परीक्षक) आणि प्रा. सी.बी. सूर्यवंशी (वरिष्ठ सल्लागार) यांचीही बिनविरोध निवड झाली.

कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रा. गुणवंत पाटील, प्रा. योगेश वाणी, प्रा. बी.एस. शेलकर, प्रा. मनीषा पाटील व प्रा. कीर्ती पाटील यांची निवड झाली. तसेच प्रा. स्वप्निल पवार आणि प्रा. दिनेश बोरसे यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

सभेचे अध्यक्षस्थान प्रताप महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ए.के. अग्रवाल यांनी भूषविले. यावेळी खा.शि. मंडळाचे नवनिर्वाचित प्राध्यापक प्रतिनिधी डी. व्ही. भलकार, संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील यांच्यासह इतर मान्यवर प्राध्यापक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व नविन कार्यकारिणी सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1190/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed