‘नारी शक्ती’ अभियानाला सलाम – अमळनेरमध्ये भव्य रक्षाबंधन सोहळा..

अमळनेर /आबिद शेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नारी शक्ती’ अभियानाला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीला अभिवादन करण्याच्या उद्देशाने अमळनेर शहरात रक्षाबंधनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. खासदार स्मिता उदय वाघ यांच्या चिकाटे गल्ली येथील कार्यालयात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या भव्य सोहळ्याला भाजपा पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते तसेच शहर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार स्मिता वाघ यांनी स्वतः कार्यकर्त्यांना व नागरिकांना राखी बांधत बंधुत्व, ऐक्य व सद्भावनेचा संदेश दिला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ यांनीही राखी बांधून सणाचा उत्साह वाढविला.
या प्रसंगी महिला आघाडीच्या भारतीताई सोनवणे, माधुरीताई पाटील, मीनाताई पाटील, रेखाताई पाटील, वसुंधराताई लांडगे, छायाताई पाटील, कविताताई जाधव, शितलताई पाटील व योगिताताई पांडे यांनी उपस्थितांना राखी बांधून महिलांच्या शक्तीचा, ऐक्याचा आणि परस्पर सन्मानाचा उत्सव साजरा केला.
कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिता वाघ म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नारी शक्ती’ अभियानाद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाचा ऐतिहासिक अध्याय सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख धोरणांमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या प्रगतीसाठी भक्कम पाया रचला गेला आहे. रक्षाबंधनासारखे सण केवळ नाती घट्ट करत नाहीत, तर समाजात ऐक्य, विश्वास आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा देतात.”
या सोहळ्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक बांधिलकी आणि ऐक्याचा संदेश देत रक्षाबंधनाचा सण खऱ्या अर्थाने ‘नारी शक्ती’ला समर्पित करण्यात आला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
