आदिवासी क्रांती दिनानिमित्त समशेर सिंगांना अभिवादन; मिरवणुकीत उत्साहाचा जल्लोष.

0
New-Doc-08-10-2025-06.51.jpg

आबिद शेख/अमळनेर



अमळनेर येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आयोजित आदिवासी बांधवांच्या भव्य मिरवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य व मुस्लिम समाजातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आरिफ भाया यांनी पारधी समाजाचे प्रख्यात नेते समशेर सिंग यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या वेळी आदिवासी समाजाचे नेते संजय पारधी, धनराज पवार, भरत चिंदा पवार, राहुल भिल, राधा बाई पवार, दाझा ताई पवार, बल्ली पवार, समाधान पारधी, राजु पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना आरिफ भाया यांनी समाजातील बंधुता, एकता व परस्पर आदराचे महत्त्व अधोरेखित करत “एकतेतच आपली ताकद आहे” असा संदेश दिला.

मिरवणुकीत विविध समाजघटकांचा उत्साही सहभाग दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात व पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढत क्रांती दिन साजरा केला.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed