अमळनेरमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळ्यात विश्व आदिवासी दिवस साजरा..

0
New-Doc-08-10-2025-07.07.jpg

आबिद शेख/अमळनेर



येथील विविध आदिवासी संघटनांच्यावतीने मंगळ ग्रह मंदिर परिसरातील विशाल पटांगणावर विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वाजत-गाजत काढलेल्या भव्य शोभायात्रेने झाली.

कार्यक्रमादरम्यान आदिवासी क्रांतिकारक व महामानवांचे स्मरण करण्यात आले. भव्य मंचावर आदिवासी विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक कला सादर करून उपस्थित हजारो आदिवासी बांधवांना थिरकायला लावले. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या कलाकारांचा सन्मानचिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.

मंचावर आदिवासी पा.क्रांती संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंखे, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, महासचिव दीपक भाऊ खांदे, सामाजिक कार्यकर्ते गुलाब बोरसे, महेंद्र पवार, भगवान सैंदाने, सौ. सखुबाई पवार, सचिव अमोल सुर्यवंशी, राज्य प्रसिद्धी प्रमुख दिनेश चव्हाण, कमलेश चव्हाण, आनंद पवार, जगदीश साळुंखे, आनंद चव्हाण, संजय पारधी, धनराज पवार, राजा सोनवणे, पंकज पारधी, विकास पवार, रावसाहेब पवार यांसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या वतीने सन्मानचिन्हे व बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यानंतर आदिवासी सांस्कृतिक मिरवणुकीचे उद्घाटन झाले. मिरवणूक ताडेपुरा, पैलाड, डॉ. आंबेडकर पुतळा, समशेरसिंग चौक, बाजार, पाचपावली मंदिर, बसस्टँड मार्गे महाराणा प्रताप चौक येथे जल्लोषात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंगळ ग्रह सेवा संस्थानचे विशेष सहकार्य लाभले. यशस्वीतेसाठी अजय पवार, रोहित ठाकरे, आकाश पवार, दादा पवार, अर्जुन महाले यांच्यासह अनेक आदिवासी युवकांनी परिश्रम घेतले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed