अमळनेरमध्ये जागतिक आदिवासी क्रांती दिवस उत्साहात साजरा..

0
New-Doc-08-09-2025-22.16.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर– संपूर्ण जगभरात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी क्रांती दिवस साजरा केला जातो. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणून हा दिवस उत्सवाच्या रूपाने साजरा केला जातो. त्यानिमित्ताने अमळनेर तालुक्यातील आदिवासी क्रांती दल शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वाजतगाजत मिरवणूक काढून पुष्पहार अर्पणाने झाली. मिरवणुकीदरम्यान राणी लक्ष्मी चौकातील हुतात्मा स्मारक, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा आणि क्रांतिवीर समशेरसिंग पारधी चौकातील आदिवासी महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात डॉ. जी. एम. पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ. अनिल शिंदे, तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, पत्रकार प्रविण बैसाणे, गोरख साळुंखे, माजी नगरसेवक संजय पवार, अ‍ॅड. शेखर खैरनार, तात्या वैदू, दयाराम मोरे, प्रभाकर पारधी, अनिकेत ब्रम्हे, मनीष ब्रम्हे, अर्जुन भील, प्रकाश मोरे, सुधाम वाघ, प्रताप चव्हाण, सतीश चव्हाण, बाळू जमादार, रातीलाल जमादार, आनंद दाभाडे, रामदास ढालवाले यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

वक्त्यांनी आदिवासी समाजाच्या इतिहास, संघर्ष आणि हक्कांच्या लढ्याबाबत विचार मांडत, समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed