पाडळसरे धरणाला ८५९ कोटींची केंद्राची मंजुरी; दोन दशकांच्या संघर्षाला यश, धरण जनआंदोलन समितीचा जल्लोषात साजरा.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – पाडळसरे निम्न तापी सिंचन प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून केंद्र शासनाने ८५९.२२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिल्याचे पत्र नुकतेच प्राप्त होताच पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी घालून, तर पुरुष कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद व्यक्त केला.
मागील दोन दशकांपासून या प्रकल्पासाठी जनआंदोलन समितीने सातत्याने लढा दिला होता. या निर्णयामुळे अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, धुळे आणि शिंदखेडा तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.
प्रकल्पाच्या मान्यतेसाठी प्रथम PIB (Public Investment Board) ची बैठक झाली. त्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून विशेष बैठक घेऊन मान्यता देण्यात आली व पुढील प्रक्रियेसाठी जलशक्ती मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला गेला. आवश्यक पूर्तता झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारच्या अर्थ विभागाने ८५९.२२ कोटी रुपयांच्या निधीला अंतिम मंजुरी देत प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश अधिकृत जाहीर केला.
जल्लोषावेळी समिती प्रमुख सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन रणजित शिंदे, महेंद्र बोरसे, हिरामण कखरे आदींनी मनोगत व्यक्त केले. समितीतर्फे खासदार स्मिता वाघ, माजी मंत्री आमदार अनिल पाटील, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच अमळनेर तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी सुभाष चौधरी, रणजित शिंदे, हेमंत भांडारकर, हिरामण कखरे, प्रताप साळी, महेश पाटील, सुनिल पाटील, देविदास देसले, सौ. उषाबाई चौधरी, सौ. वसुंधरा लांडगे, सौ. पायल पाटील, सौ. माधुरी पाटील, प्रशांत भदाणे, सुनिल भोई, सुरेश पाटील, महेंद्र बोरसे, ॲड. कुंदन साळुंखे, रामराव पवार, रहेमतुल्ला पिंजारी, लोटन पाटील, पुरुषोत्तम शेटे, कृषिभूषण सतिश काटे, गोकुळ पाटील, सुशिल भोईटे, दिलीप पाटील, मनोहरनाना पाटील, दशरथ लांडगे, अधिकाराव पाटील, नारायण पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र देसले, भावेश चौधरी, पंकज भोई आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
