भरदिवसा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात..

अमळनेर /आबिद शेख
शहरातील प्रताप मिल्क कंपाऊंड परिसरातून भरदिवसा चोरी गेलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. MH 19 AF 4255) अमळनेर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत हस्तगत केली असून, आरोपी विजय भाईदास भील (वय 19, रा. एकरुखी, ता. अमळनेर) याला अटक करण्यात आली आहे.
घटनेप्रमाणे, 31 जुलै 2025 रोजी दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या सुमारास मोटरसायकल मालक राजेंद्र रतनलाल वर्मा जेवणासाठी घरी आले असता, अज्ञात चोरट्याने घरासमोर हँडल लॉक केलेली दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. अखेर आरोपीला एकरुखी येथून अटक करण्यात आली. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने चोरी केलेली मोटरसायकल डुबकी मारुती मंदिराजवळील झुडपांमध्ये लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर मोटरसायकल हस्तगत करून जप्त करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेतकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक होते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक निकम यांनी नागरिकांना वाहन व मालमत्ता सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करत, घर, कार्यालय, गोडाऊन आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना दिली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
