पुण्यात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात. अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीने सोहळ्याला उभारी.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर-पुणे परिसरात खान्देशी बांधवांचा भव्य कानबाई उत्सव जल्लोषात पार पडला. माजी मंत्री व अमळनेरचे भूमिपुत्र आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिकच वाढली. खान्देशी कलाकारांच्या विशेष सहभागामुळे कार्यक्रम बहारदार ठरला.

आमदार पाटील यांना चाकण, पिंपरी चिंचवड, वाल्हेकर वाडी, पिरंगुट आदी ठिकाणी होणाऱ्या कानबाई उत्सवांसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात पुणे जिल्ह्यातील पहिला मानाचा कानबाई उत्सव पार पडला. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात खान्देशातील पारंपरिक रितीरिवाजांनुसार देवीचे रोट दळणे, स्थापना, जागरण-गोंधळाचे आयोजन करण्यात आले.
या उत्सवात मिसेस इंडिया इंटरनॅशनल अभिनेत्री सौ. मृणाल पाटील, गायक दिलीप गायकवाड, विशाल बाविस्कर, अहीराणी अभिनेत्री ऋतूजा घोडतूरे, क्रांती पाटील, ‘खान्देशी फॉरेनर’ अरुण सोनार यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावून नृत्य, गाणी आणि विनोदी कला सादर केली. उपस्थित भक्तांनी कानबाई मातेच्या गाण्यांवर ठेका धरत उत्सवात रंग भरले.
आपल्या भाषणात आमदार पाटील यांनी अहीराणी भाषेत विनोद व उदाहरणे देत उपस्थितांचे मन जिंकले. “४०० किलोमीटर दूर असूनही आपली संस्कृती, भाषा आणि सण-उत्सव जोपासण्याचे काम खान्देशी बांधव करत आहेत,” असे कौतुक त्यांनी केले. चाकण येथील बांधवांनी आमदार पाटील यांना एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
संपूर्ण सोहळा सौ. अरुणा पगारे यांच्या अध्यक्षतेखाली, खजिनदार रमेश पगारे यांच्या प्रयत्नाने यशस्वी झाला. आरतीचा मान उद्योजक राणा प्रितम परदेशी व सौ. आरती परदेशी यांना देण्यात आला. विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक आणि संघटनांचे पदाधिकारी यांनीही कानबाई मातेचे दर्शन घेत शुभेच्छा दिल्या.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
