पाडळसरे धरण प्रकल्प PMKSY योजनेत सामाविष्ट; ८५९ कोटींच्या निधीला मंजुरीखासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला यश; जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला नवे बळ..

0
New-Doc-08-09-2025-06.51.jpg


ऐतिहासिक क्षणी फटाके फोडून, पेढे भरवून, संपूर्ण गावाने एकत्र येऊन जल्लोष केला!

आबिद शेख/ अमळनेर
जळगाव जिल्ह्याच्या सिंचन क्षमतेला मोठी चालना देणाऱ्या पाडळसरे धरण (निम्न तापी) प्रकल्पाला केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत (PMKSY) अखेर या प्रकल्पाचा समावेश झाला असून, केंद्राने तब्बल ८५९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निर्णयाची अधिकृत अधिसूचना आज प्रसिद्ध झाली.

या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अमलबजावणीला वेग येणार असून, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. यापूर्वीच या प्रकल्पाला PIB मान्यता मिळाली होती; मात्र PMKSY मध्ये समावेश झाल्याने निधी वितरण, प्रशासकीय मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या प्रक्रिया गतीमान होतील.

खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला. खासदार झाल्यापासूनच त्यांनी केंद्र व राज्याच्या विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. लोकसभेत मुद्दा मांडण्यापासून ते केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला.

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार वाघ म्हणाल्या, “पाडळसरे प्रकल्पाच्या PMKSY योजनेतील समावेशामुळे जळगाव जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी नवा अध्याय सुरू होणार आहे. हा निधी मंजूर होणे ही केवळ सुरुवात आहे; यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल.”

प्रकल्पामुळे तापी नदीच्या पाण्याचा शाश्वत व कार्यक्षम वापर शक्य होईल. सिंचन सुविधेमुळे शेती उत्पादन वाढेल, पीक विविधीकरणाला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. यासाठी खासदार वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांचे विशेष आभार मानले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 101300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 77000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1195/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed