ब्रह्माकुमारीज फरांदे पार्कतर्फे ईश्वरीय रक्षाबंधन उत्साहात साजरा..

0
New-Doc-08-08-2025-12.18.jpg

24 प्राईम न्यूज 8 Aug 2025

नांदेड – फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रक्षाबंधन हा पवित्र सण मोठ्या आध्यात्मिक उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ब्रह्माकुमारिज वसंत नगर येथील वरिष्ठ राजयोगीनी स्वाती दिदी, बि.के. अनिता दिदी, बि.के. सत्या दिदी व योगिनी दिदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बि.के. अनिता दिदींनी केले. स्वाती दिदींनी रक्षाबंधन या भाऊ-बहिणींच्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने “हेल्थ अँड वेल्थ” सोबतच अध्यात्मिक कोर्स करण्याचा संकल्प परमात्म्याकडे करू या, असे प्रतिपादन केले. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत परमात्मा संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना ईश्वरीय राखी बांधण्यात आली.

या कार्यक्रमास फरांदे पार्क व परिसरातील बि.के. परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, बंधुत्व व आध्यात्मिकतेच्या वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed