उतराखंडमध्ये अडकलेल्या १६ जळगावकरांच्या सुटकेसाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत तळ – सर्व भाविक सुरक्षित.

0
New-Doc-08-08-2025-07.07.jpg

24 प्राईम न्यूज 8 Aug 2025


उतराखंडमधील अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १६ भाविकांच्या सुटकेसाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तातडीच्या बैठका घेत आहेत.

पाटील यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू आणि पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी थेट संपर्क साधून भाविकांना दिल्लीमार्गे सुरक्षित आणण्याची विनंती केली. हिमांशू यांनी तातडीने सुटका व पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

या मोहिमेत स्मिता शेलार, सहाय्यक निवासी आयुक्त आशुतोष दिवेदी आणि महाराष्ट्र सदनचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते. बैठकीत राज्य सरकार, रेल्वे प्रशासन आणि उत्तराखंड प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचा निर्णय झाला.

अडकलेल्यांमध्ये पाळधी (ता. धरणगाव) येथील १३ तरुण आणि जळगाव शहरातील एका कुटुंबातील ३ जणांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे सुरक्षित आहेत.

पालकमंत्री पाटील म्हणाले, “सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून भाविकांना सुखरूप परत आणले जाईल.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed