जळगावला वंदे भारतचा थांबा; रेल्वेमंत्री वैष्णव यांचे खासदार स्मिता वाघ यांच्याकडून आभार.

0
New-Doc-08-08-2025-06.43.jpg

१२ तासांत पुणे-नागपूर प्रवास; जळगावला वंदे भारतची थेट सोय.


आबिद शेख/अमळनेर


22 कॅरेट 916 हॉलमार्क दागिने खरेदीवर
हमखास भेटवस्तू …..

उत्तर महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! अजनी (नागपूर) – पुणे वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले.

या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना आधुनिक, वेगवान आणि आरामदायक प्रवासाचा लाभ होणार असून, पुणे-नागपूर रेल्वे प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण होईल. पुणे आणि नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरांशी जळगावची थेट व दर्जेदार कनेक्टिव्हिटी साधली जाणार आहे.

खासदार वाघ यांनी यापूर्वी रेल्वे मंत्रालयाच्या बैठकीत जळगावसाठी वंदे भारतचा थांबा देण्याची मागणी केली होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेचा शुभारंभ होणार आहे. या भेटीत जळगाव आणि खान्देशातील इतर रेल्वे प्रकल्पांवरही चर्चा झाली असून, मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे वाघ यांनी सांगितले.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1180/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed