धुळ्यात मोफत अँजिओप्लास्टीसह हृदयविकारावर आधुनिक उपचार! – फक्त आधार कार्ड पुरेसे, उत्पन्नाची अट नाही.

0
New-Doc-08-07-2025-09.35.jpg

24 प्राईम न्यूज 7 Aug 2025

खान्देशातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! धुळे जिल्हा रुग्णालयात राज्य शासनाच्या १८ कोटींच्या निधीतून अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिट उभारण्यात आले असून, येथे लवकरच हृदयविकारावर मोफत तपासण्या व शस्त्रक्रिया सुरू होणार आहेत. या सुविधेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नसून केवळ आधार कार्ड दाखवले की रुग्णांना सेवा उपलब्ध होणार आहे.
या कॅथलॅबमध्ये खालील सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहेत:
ईसीजी (खासगी रुग्णालयात ₹200–₹500)
टुडी इको (₹1200–₹1500)
कलर डॉपलर (₹2500–₹3000)
अँजिओग्राफी (₹10,000–₹50,000)
अँजिओप्लास्टी (₹1.5 लाख–₹5 लाख)
राज्यभरातील रुग्णांना लाभ:
साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात उभारलेले हे कॅथलॅब युनिट महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील रुग्णांसाठी खुले आहे. ६ हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात बांधलेल्या या युनिटमध्ये १० अत्याधुनिक हायड्रोलिक ICU बेड, आयएबीपी, इंजेक्टर, रेडिएशन उपकरणे आणि इतर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी टेक्निशियन, परिचारिका, कक्षसेवक अशा ३५ पदांची भरती प्रस्तावित असून, यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. नर्स कॉल सिस्टीम, स्मार्ट बेड्स आणि इतर सुविधा यामुळे रुग्णालयाचा दर्जा खासगी रुग्णालयांइतकाच उंचावला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ७ हजारांहून अधिक मृत्यू हृदयविकारामुळे झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर हे युनिट रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार आहे.

डॉ. दत्ता देगावकर (जिल्हा शल्यचिकित्सक, धुळे) यांनी सांगितले की, “खान्देशातील हे पहिले कॅथलॅब युनिट असून राज्यातील कुठल्याही रुग्णाला येथे मोफत उपचार मिळतील. रिक्त पदभरती प्रक्रियेची मंजुरी लवकरच मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed