प्रेमभंगाचा धक्कादायक शेवट : प्रेयसीने नकार दिल्याने २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथे प्रेयसीकडून स्पष्ट नकार मिळाल्याने नैराश्यात गेलेल्या गांधली येथील गौरव रवींद्र बोरसे (वय २१) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना क्रीडा संकुलाच्या शेजारील डुबक्या मारोती रस्त्यावर ६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारास उघडकीस आली.

गौरवने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल विनोद भोई, मिलिंद बोरसे आणि विनोद संदानशिव यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. त्यानंतर गौरवचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी गौरवने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये त्याने आपल्या आईला भावनिक संदेश देत म्हटले, “आई, मी तुझ्या स्वप्नांची पूर्तता करू शकलो नाही… रडू नकोस.” तसेच, वडिलांनी कधीच त्याच्यावर पैसे खर्च करू इच्छित नव्हते, अशी खंतही त्याने व्यक्त केली.
तो पुढे आपल्या मित्रांना आवाहन करत म्हणाला, “प्रेम करू नका मित्रांनो… अभ्यासात लक्ष द्या… मी एका मुलीवर प्रेम केले, पण तिने मला नकार दिला. मी खरोखर प्रेम केलं होतं… पण ती विसरून गेली…”
मिळालेल्या माहितीनुसार, गौरवने वय पूर्ण झाल्यावर प्रेयसीकडे लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र तिने स्पष्ट शब्दांत नकार देत, “मी तुला विसरले आहे,” असे म्हटल्याने गौरव मानसिक तणावात गेला. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि काही वेळातच त्याने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला.
या प्रकरणी भूषण हेमराज सूर्यवंशी यांच्या माहितीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76300/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
