अमळनेर अर्बन बँकेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आरोग्य सेवा साधनांचे लोकार्पण १० ऑगस्ट रोजी..

0
New-Doc-08-06-2025-09.34.jpg


आबिद शेख/ अमळनेर


दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त १० ऑगस्ट २०२५ रोजी, रविवार सकाळी ९ वाजता इंदिरा भवन, अमळनेर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.

या विशेष कार्यक्रमात बँकेच्या सभासदांच्या इयत्ता १०वी व १२वीतील ७५% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत पाल्यांचा गौरव व सत्कार भेटवस्तू देऊन केला जाणार आहे.
गौरवासाठी सभासदांनी आपल्या गुणवंत पाल्यांचे गुणपत्रक (झेरॉक्स प्रती) बँकेच्या कार्यालयीन वेळेत व्यवस्थापक अमृत पाटील यांच्याशी संपर्क करून लवकरात लवकर सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर, गरजू व गंभीर रुग्णांसाठी उपचारांनंतर उपयुक्त ठरणारी महागडी आरोग्य सेवा साधने या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात येणार आहेत.

या उपक्रमासाठी बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, व्यवस्थापक अमृत पाटील आणि संचालक मंडळाने सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed