दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात; ऑक्टोबरअखेर जिल्हा परिषद, तर डिसेंबरमध्ये महापालिकांवर आचारसंहिता..

0
New-Doc-08-06-2025-07.05.jpg

24 प्राईम न्यूज 6 Aug 2025
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि मतदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक तयारीला सुरुवात केली असून, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी नाशिक विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला.

या बैठकीनंतर वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यात दिवाळीनंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. ऑक्टोबरअखेर जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल वाजणार असून, डिसेंबरअखेर महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजीच्या सुनावणीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील ४ महिन्यांत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मतदान केंद्र निश्चिती, मतदान यंत्रांची उपलब्धता, निवडणूक कर्मचाऱ्यांची नियोजन आदी बाबींचा आढावा घेण्यासाठी नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयात बैठक घेण्यात आली.

गट-गण रचना आणि ओबीसी आरक्षण:
राज्यात सध्या गट-गण रचनेची प्रक्रिया सुरू आहे. वाघमारे यांनी स्पष्ट केले की, ही रचना न्यायालयाच्या ४ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसारच पूर्ण केली जाईल. यामध्ये ओबीसी आरक्षण रोटेशन पद्धतीने दिले जाणार आहे.

या बैठकीला आयोगाचे सचिव सुरेश काकाणी व विभागीय आयुक्त प्रविण गेडाम उपस्थित होते.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed