गणेश भामरे यांचा महसूल सप्ताहात उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून गौरव..

0
New-Doc-08-05-2025-22.46.jpg

आबिद शेख,/अमळनेर



महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ब्राह्मणे (ता. अमळनेर) येथील पोलिस पाटील गणेश भामरे यांना “उत्कृष्ट पोलिस पाटील” पुरस्काराने गौरविण्यात आले. ५ ऑगस्ट रोजी चोपडा येथे झालेल्या समारंभात प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला अमळनेर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, डी.आर. सौंदाणे, आर.आर. ढोले यांच्यासह अमळनेर प्रांत कार्यालयातील विविध अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, क्लार्क व महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गणेश भामरे यांनी बाम्हणे परिसरात वाळू चोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवत प्रभावी भूमिका बजावली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात बाम्हणे फाट्यावर जिल्हा तपासणी नाक्यावर ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रभावी बंदोबस्त ठेवला.

गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्यांनी सामंजस्याची भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली. यामुळे बाम्हणे गावाने “तंटामुक्त गाव” उपक्रमात जिल्हास्तरावर दुसरा क्रमांक मिळविला. निवडणूक काळात गावात आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली.

भामरे यांच्या पुढाकारातून गावात १८ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थापना करण्यात आली, तर सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी गावातील कार्यकारी सोसायट्यांच्या चेअरमन पदाची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली.

त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्यासह सामाजिक व राजकीय वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed