बांबू लागवडीच्या फाईली मंजूर करण्यासाठी ३६ हजाराची लाच घेताना वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक.
आबिद शेख/अमळनेर

बांबू लागवड योजनेतील लाभ मंजूर करून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वन विभागातील अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले आहे. आरोपींकडून तडजोडीअंती ३६,००० रुपये स्वीकारण्यात आले असून, तिघा आरोपींविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोपींची नावे:
- मनोज बबनराव कापूरे (वय ५४), वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, पारोळा (अति. कार्यभार – अमळनेर)
- निलेश मोतीलाल चांदणे (वय ४५), लिपिक, वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, पारोळा
- कैलास भरत पाटील (वय २७), कंत्राटी चालक, राहणार मोरफळ, ता. पारोळा
शेतकरी असलेल्या तक्रारदाराने व त्यांच्या तीन नातेवाईकांनी सडावण शिवारातील शेतजमिनीत “अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड” योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागात चार फाईल्स मंजुरीसाठी दाखल केल्या होत्या. यासंदर्भात २३ जुलै २०२५ रोजी त्यांनी सामाजिक वनीकरण विभाग पारोळा येथील RFO श्री. कापूरे यांची भेट घेतली असता, त्यांनी प्रत्येकी १०,००० रुपये प्रमाणे एकूण ४०,००० रुपये लाच मागितली.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव एसीबी कार्यालयात तक्रार दिली. पडताळणी दरम्यान, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी मिळून ३५,००० रुपये स्वतःसाठी व १,००० रुपये लिपिकासाठी अशी एकूण ३६,००० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम आरोपी क्रमांक ३ कैलास पाटील याने पंचासमक्ष स्वीकारली.
कारवाईदरम्यान:
तिघाही आरोपींना पंचासमक्ष रंगेहात अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लाच स्वीकारताना वापरलेल्या नोटांची हॅश व्हॅल्यू सुद्धा घेण्यात आली आहे.
श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, एसीबी, जळगाव
श्री. हेमंत नागरे, पोलीस निरीक्षक, एसीबी, जळगाव
मा. श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, एसीबी नाशिक परिक्षेत्र
मा. श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, एसीबी नाशिक परिक्षेत्र
कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी त्वरित एसीबी जळगाव कार्यालयाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
📞 दूरध्वनी क्रमांक: 0257-2235477
📞 टोल फ्री क्रमांक: 1064
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
