निम्न तापी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा – आ. अनिल पाटील..

0
New-Doc-08-05-2025-23.45.jpg

आबिद शेख/अमळनेर अमळनेर तालुक्यातील बोहरे, कलाली, प्र. डांगरी व सात्री या चार गावांसह चोपडा तालुक्यातील विटनेर, बुधगाव, नांदेड-नांथे, घाडवेल, अनवरदे खुर्द, होळ व अजंदे खुर्द या गावांच्या पुनर्वसनाचा मार्गही मोकळा झाला आहे.

आ. पाटील यांचा ठाम आग्रह

या बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी टप्पा दोनमधील अंशतः किंवा ५० टक्के बाधित होणाऱ्या गावांचेही पुनर्वसन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली. भविष्यात ही गावे पूर्णतः बाधित होणारच असल्याने आताच निर्णय घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने दोन्ही टप्प्यातील पुनर्वसनाला मंजुरी मिळाली.

बोहरे ग्रामस्थांना मिळाला न्याय

या निर्णयामुळे विशेषतः बोहरे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला न्याय मिळाल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
बैठकीत घेण्यात आलेले अन्य महत्वपूर्ण निर्णय
शेतीसाठी बंद नलिका पाणी वितरण प्रणालीस मान्यता
निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील उर्वरित 17,943 हेक्टर क्षेत्राला बंद नलिका प्रणालीद्वारे पाणी देण्यासाठी सर्वेक्षण व संकल्पन तयार करण्यास मान्यता देण्यात आली.
सात्री गावातील भूखंड वाटप व जमीन संपादनास मंजुरी
अमळनेर तालुक्यातील सात्री गावातील 33 कुटुंबांना भूखंड वाटप करण्यास व अतिरिक्त 1.13 हेक्टर जमीन संपादित करण्यास बैठकीत मान्यता मिळाली.
अमळनेर नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी जमीन वलती
24×7 पाणीपुरवठा योजनेसाठी 0.39 हेक्टर जमीन वलती करण्यास जलसंपदा विभागाने परवानगी दिली.
माळण नदी – पांझरा जोड कालव्याच्या पाणी उपलब्धतेसाठी कार्यवाहीचे आदेश
या कालवा योजनेसाठी पाणी उपलब्धतेबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार

या सर्व निर्णयांमुळे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांना मार्ग सापडला असून, आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76500/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1165/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed