युरिया 266 रुपयांपेक्षा महाग मिळाल्यास खरेदी बंदचा निर्णय खते, बियाणे विक्रेता असोसिएशनचा ठराव; शेतकऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता..

0
New-Doc-08-03-2025-07.13-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – किरकोळ कारणांवरून कृषी केंद्रांवर सातत्याने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ, युरिया खत २६६ रुपयांपेक्षा कमी दरात मिळेपर्यंत त्याची खरेदी पूर्णतः बंद ठेवण्याचा ठराव जळगाव जिल्हा फर्टिलायझर, पेस्टिसाईड्स आणि सिड्स डीलर्स असोसिएशनने नुकत्याच पार पडलेल्या तातडीच्या बैठकीत केला.

असोसिएशनने हा ठराव कृषी विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठविला आहे. ठरावानुसार, कृषी केंद्रांवर शिल्लक असलेला युरिया खतच विकला जाईल; नवीन खरेदी पूर्णतः थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

“एमआरपीपेक्षा महाग युरिया, आम्हाला तोट्यात विकावा लागत होता”

बैठकीत बोलताना अध्यक्ष विनोद तराळ, उपाध्यक्ष प्रफुल्ल बांठीया, सचिव कैलास मालू, सहसचिव राजेंद्र पाटील आणि खजिनदार शैलेश काबरा यांनी स्पष्ट केले की, सध्या युरिया खत आम्हाला एमआरपीपेक्षा जास्त दरात मिळत आहे. तरीही आम्ही तो शेतकऱ्यांना कमी दरात विक्री करत होतो. मात्र, या परिस्थितीत आम्हाला शेतकऱ्यांच्या रोषासह शासनाच्या कारवाईलाही तोंड द्यावे लागत आहे.

त्यामुळे आता युरिया खत २६६ रुपयांच्या आत उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणीही खत खरेदी करणार नाही, असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed