लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजरत्न पुरस्कार वितरणासाठी नामांकन प्रक्रिया सुरु.             राज्यभरातील कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांना मिळणार गौरव

0
New-Doc-08-03-2025-12.07.jpg

24 प्राईम न्यूज 3 Aug 2025



ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन गौरव सन्मान सोहळा व समाजरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

“सन्मान निष्ठेचा, गौरव कर्तृत्वाचा” या ब्रीदवाक्याशी सुसंगत असलेल्या या कार्यक्रमामार्फत सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, पत्रकारिता, युवा, महिला व आदर्श ग्रामपंचायत अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करण्यात येणार आहे.

“पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते” या विचारसूत्राने प्रेरित होऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी राज्यभरातून नामांकन मागविण्यात आले असून इच्छुकांनी आपली माहिती लवकरात लवकर ए.डी. फाऊंडेशनकडे पाठवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गुणवंत व्यक्तींना विशेष प्रमाणपत्र (CERTIFICATE) देण्यात येणार असून, हा कार्यक्रम सामाजिक प्रेरणेसोबतच नव्या उमेदीसाठी एक महत्त्वाचा मंच ठरणार आहे.

गुणवंतांनो, या प्रेरणेच्या चैतन्यदायी प्रवाहात सहभागी व्हा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed