प्रताप महाविद्यालयात बीजांकुरण तंत्रावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न..

0
New-Doc-08-03-2025-06.43.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभाग, नौरोजी गोदरेज वनस्पती संशोधन केंद्र (शिंदेवाडी, शिरवाल – सातारा), आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “बीजांकुरण तंत्र” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पूज्य सानेगुरुजी सभागृहात करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एच. डी. जाधव होते. कार्यशाळेचे प्रमुख वक्ते व मुख्य अतिथी डॉ. सागर दातीर (NGCPR) यांनी “बीजांकुरण व अंकुरणावर परिणाम करणारे घटक” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी तापमान, आर्द्रता, प्रकाश व मातीच्या गुणवत्तेसारख्या महत्त्वाच्या घटकांचे बीजांकुरणावर होणारे परिणाम स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रयोगशाळेमध्ये डॉ. दातीर आणि त्यांच्या टीमने बीज चाचणी, अंकुरण प्रक्रिया आणि संरक्षण याविषयी प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनी या सत्रात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रा. जयेश साळवे यांनी आधुनिक शेतीसाठी बीजांकुरणाच्या नवतंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एस. मराठे यांनी केले. समारोपप्रसंगी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले व या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी प्रेरणा दिली. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये बीजांकुरण तंत्राविषयी जागरूकता वाढली असून, शेतकी क्षेत्रात नव्या संधींची ओळख पटली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात खा.शि. मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अरुण जैन, सचिव प्रा. पराग पाटील, IQAC समन्वयक डॉ. मुकेश भोळे, प्रा. प्रगती पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. हर्षाली चौधरी, प्रा. ज्योती पडूळ, प्रा. हर्षदा शिंदे, प्रा. कल्याण लोहार, श्री. संदीप बिऱ्हाडे, कुलसचिव राकेश निळे, लेखापाल देवेंद्र कांबळे, मुख्य लिपिक भटू चौधरी, तसेच दीपक चौधरी, विवेक महाजन, मानव सरदार व रेहान मुजावर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचा सहभाग अतुलनीय असल्याचे प्रा. साळवे यांनी विशेष उल्लेख केला.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed