शासकीय कर्तव्यात अडथळा आणणाऱ्यास शिक्षा: ‘ईस्माईल खड्डा’ला ३ महिने सश्रम कारावास..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्डला मारहाण करणाऱ्या इस्माईल जहुर पठाण उर्फ ईस्माईल खड्डा (वय 29, रा. पानखिडकी, जिनगर गल्ली, अमळनेर) यास 3 महिने सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सदर प्रकरणामध्ये फिर्यादी दिलीप मराठे आणि त्यांचे सहकारी पोलीस सुभाष चौक, अमळनेर येथे वाहतूक नियंत्रणाचे काम करत असताना, आरोपीने त्यांना अडवून “तू कोण? पोलीसाचा ड्रेस का घातला?” असे विचारून अरेरावी केली. तसेच फिर्यादीच्या उजव्या कानशिलात मारहाण करत खाकी ड्रेसची कॉलर पकडून ओढाताण केली. त्याचप्रमाणे फिर्यादीसोबत असलेल्या पो.ना. 114 ललित पाटील यांचीही कॉलर पकडून मारहाणीचा प्रयत्न केला होता.
या घटनेनंतर अमळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 663/2020 अंतर्गत भा.दं.वि. कलम 353, 332, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर सेशन केस क्र. 08/2021चा सुनावणीप्रसंगी मा. तदर्थ व अति. जिल्हा न्यायाधीश-2 श्री. एल. डी. गायकवाड यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज पार पडले.
सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, घटनेस्थळी असलेले होमगार्ड, तसेच सुभाष चौक येथील साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम 353 अंतर्गत 3 महिने सश्रम कारावास व 2000 रुपये दंड, तसेच कलम 332 अंतर्गत 3 महिने सश्रम कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
सदर खटल्यात अमळनेर पो.स्टे. येथील केस वॉच अधिकारी पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पैरवी अधिकारी पी.एस.आय. उदयसिंग साळुंके (पारोळा पो.स्टे.), पो.कॉ. राहुल रणधीर (चोपडा ग्रामीण), पो.हे.कॉ. प्रमोद पाटील (चोपडा शहर), पो.कॉ. भरत इशी (मारवड पो.स्टे.) आणि पो.कॉ. सतीश भोई (अडावद पो.स्टे.) यांनी सहकार्य केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
