सावखेडा येथे लतिका चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य; पालकांचा ट्रस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेमध्ये लतिका चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर पालकांनी ट्रस्टच्या सामाजिक भानाला मनापासून दाद दिली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा तायडे यांनी प्रास्ताविक करून केली. यावेळी दप्तर वाटप लतिका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शत्रुघ्न वानखेडे, सचिव आनंद वानखेडे आणि लतिका वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमाला गावकऱ्यांचा आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र अहिरे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्रनाथ कदम, अनिल नेरकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते विश्वास भिल, गिरधर भिल, शाहरुख खाटीक, योगेश तिरमले, सोनाली भिल, विलास कदम, संजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका वैशाली बोरसे, प्रमिला मोरे, रोशनी महाले, वंदना कदम आणि उदय कदम यांनी विशेष मेहनत घेतली.
लतिका चॅरिटेबल ट्रस्टकडून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाविषयी नवे उत्साह निर्माण झाला आहे. या सामाजिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शिक्षणवाढीस चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 100200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 92200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76200/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
