सावखेडा येथे लतिका चॅरिटेबल ट्रस्ट पुणे मार्फत शालेय दप्तर वाटप
विद्यार्थ्यांच्या हाती नवे दप्तर, चेहऱ्यावर आनंद
अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेमध्ये लतिका चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. सुषमा तायडे यांनी प्रास्ताविक करून केली. दप्तर वाटप लतिका चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शत्रुघ्न वानखेडे, सचिव आनंद वानखेडे आणि लतिका वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाची गावकऱ्यांनी व पालकांनी प्रशंसा केली.
कार्यक्रमाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेंद्र अहिरे, ग्रामपंचायत सदस्य रविंद्रनाथ कदम, अनिल नेरकर, तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते विश्वास भिल, गिरधर भिल, शाहरुख खाटीक, योगेश तिरमले, सोनाली भिल, विलास कदम, संजय कदम यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका वैशाली बोरसे, प्रमिला मोरे, रोशनी महाले यांच्यासह वंदना कदम आणि उदय कदम यांनी विशेष मेहनत घेतली.
शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत मिळाल्यामुळे त्यांच्यात शिक्षणाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून, लतिका ट्रस्टचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. बातमी तयार करून पाहिजे हेडिंग सह
