भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार 2025 आदर्श दिव्यांग गिर्यारोहक पुरस्काराने केशव भांगरे सन्मानित..
24 प्राईम न्यूज 27 Jul 2025
पंचायत समिती अकोले (जि. अहिल्यानगर) शिक्षण विभागाचे दिव्यांग कर्मचारी तथा अकोले तालुक्यातील सुप्रसिद्ध गिर्यारोहक केशव भांगरे यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय “आदर्श दिव्यांग गिर्यारोहक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

हा सन्मान पुणे येथील ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात आयोजित भव्य सोहळ्यात विशेष मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्रातील 100 पेक्षा जास्त गड-किल्ले हे दिव्यांगावर मात करून यशस्वीरीत्या सर करण्याचा विक्रम केशव भांगरे यांनी केला आहे. त्यांच्या या अद्वितीय कार्याची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला.
केशव भांगरे यांचा हा गौरव सर्व दिव्यांगांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
