डॉ. शुभम वैभव आगटे यांना “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

0
New-Doc-07-27-2025-16.45.jpg

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025

सातारा │ ए. डी. फाऊंडेशनतर्फे आयोजित भव्य सोहळ्यात साताऱ्याचे सुपुत्र डॉ. शुभम वैभव आगटे यांना “भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

“मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान होती है,
पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है…”

या प्रेरणादायी ओळी डॉ. आगटे यांच्या जीवनावर अगदी तंतोतंत लागू पडतात. गरीब कुटुंबात जन्म घेऊन अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी कला व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

डॉ. आगटे यांच्या कार्यातून समाजात नवचैतन्य निर्माण झाले असून, सकारात्मक बदल घडवण्याच्या त्यांच्या प्रेरणादायी कार्याची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed