रत्नागिरीच्या हिना जांभारकर यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार

0
New-Doc-07-27-2025-15.09.jpg

24 प्राईम न्यूज 27 Jul 2025
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात आदर्श शिक्षक या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सौ. हिना शुकुर जांभारकर यांना सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल भावना व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, “या यशामागे ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केले, त्या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानते.”मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, पडवे चे चेअरमन व सर्व सभासद
JSW च्या योगिता महाकाळ मॅडम
त्यांचे परिवारातील सर्व सदस्य व विशेषतः आई-वडील

विशेष सहकार्य करणाऱ्यांमध्ये –
शाळेचे अध्यक्ष श्री. मकबुल जांभारकर (Daddy)
अमानत जांभारकर (भाऊ)
सुफदर जांभारकर (मामा)
Dr. M.Q. Dalvi Urdu High School, Waghiware चे मुख्याध्यापक भाक्ष्ये सर

हिना जांभारकर सध्या BA, B.Ed शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून कार्यरत असून त्या रत्नागिरी जिल्ह्यातील पडवे (ता. गुहागर) या गावच्या रहिवासी आहेत.

त्यांनी पुढे सांगितले की, “आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व सहकार्यामुळेच मला हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. आपले असेच सहकार्य व प्रेम पुढेही लाभो, हीच अपेक्षा आहे.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed