मुंबई ट्रेन ब्लास्ट प्रकरण: १९ वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय – १२ आरोपी निर्दोष मुक्त…
24 प्राईम न्यूज 22 Jul 2025

११ जुलै २००६ रोजी संध्याकाळी मुंबईतील उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या भीषण हल्ल्यात १८९ जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील १२ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने १९ वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले आहे.

या आरोपींना २०१५ मध्ये ट्रायल कोर्टाने शिक्षा सुनावली होती. त्यापैकी ५ जणांना फाशीची, तर ७ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आरोपी हे ‘स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सदस्य असल्याचा दावा सरकारी वकिलांनी केला होता.
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले आरोपी
- कमल अहमद अन्सारी (मधुबनी, बिहार) – पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण व माटुंगा स्फोटाचा आरोप. सुनावणीदरम्यान २०२१ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी निधन.
- मोहम्मद फैसल रहमान शेख (मीरा रोड, ठाणे) – कट रचणाऱ्यांपैकी प्रमुख. पाकिस्तानकडून निधी घेऊन बॉम्ब तयार करण्याचा व ट्रेनमध्ये पेरण्याचा आरोप.
- एहतेशाम सिद्दीकी (४२) – गाड्यांची रेकी व मीरा-भाईंदर बॉम्बस्फोटाचा आरोप.
- नवीद हुसेन खान रशीद (सिकंदराबाद, ४४) – वांद्रे येथील स्फोटासाठी बॉम्ब तयार करण्याचा व पेरण्याचा आरोप.
- आसिफ खान बशीर खान (जळगाव, ५२) – बोरिवली स्फोटासाठी बॉम्ब तयार व पेरण्यात मदत केल्याचा आरोप; सिमीचा प्रमुख सदस्य असल्याचा दावा.
जन्मठेपेची शिक्षा सुनावलेले आरोपी
- तनवीर अहमद अन्सारी (आग्रीपाडा, मुंबई, ५०) – पाकिस्तानातील दहशतवादी छावण्यांना भेट देऊन गाड्यांची रेकी केल्याचा आरोप.
- मोहम्मद शफी (४६) – हवाला रॅकेट चालवून पाकिस्तानमधून निधी गोळा केल्याचा आरोप.
- शेख मोहम्मद अली आलम (५५) – गोवंडीतील घरात बॉम्ब तयार करण्याचा व सिमी सदस्यत्वाचा आरोप.
- मोहम्मद साजिद अन्सारी (मीरा रोड, ४७) – बॉम्बसाठी टायमर खरेदी व दोन पाकिस्तानी नागरिकांना आश्रय दिल्याचा आरोप.
- मुझम्मिल रहमान शेख (४०) – सॉफ्टवेअर इंजिनिअर; पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण व लोकल ट्रेनची रेकी केल्याचा आरोप.
- सुहैल महमूद शेख (५५) – पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण व बॉम्ब ठेवलेल्या गाड्यांची रेकी.
- जमीर रहमान शेख (५०) – कट रचण्यासाठी बैठकांना उपस्थिती व पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा आरोप.
१९ वर्षांनी निर्दोष मुक्तता
या सर्व आरोपींना २०१५ पासून शिक्षा भोगावी लागत होती. मात्र, पुराव्याअभावी आणि तपासातील त्रुटींमुळे उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे पुन्हा एकदा २००६ च्या हल्ल्याच्या तपासाची विश्वसनीयता प्रश्नचिन्हाखाली आली आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1160/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
