बालिका स्नेही पंचायततर्फे बालविवाहमुक्त व व्यसनमुक्ती जनजागृती उपक्रम
प्रतिनिधी – पिंपळे
ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून तसेच कै. सु. आ. पाटील माध्यमिक विद्यालय, पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एच. भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने बालविवाहमुक्त, व्यसनमुक्ती आणि तंबाखूमुक्त गाव करण्याची शपथ घेण्यात आली.
गावात काढण्यात आलेल्या प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी –
“मुलींचे शिक्षण – प्रगतीचे रक्षण”, “पर्यावरण वाचवा – भविष्य घडवा”, “दारू पळवा – गाव वाचवा”
अशा प्रभावी घोषणांद्वारे ग्रामस्थांचे लक्ष वेधले.
यानंतर समृद्धी ग्रामपंचायत व बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाटिकेद्वारे मुलींवरील अन्याय, शिक्षणाचे महत्त्व, बालविवाह प्रतिबंध आणि दारू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम यासारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये –
- पिंपळे खुर्द येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील
- सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील
- पुरुषोत्तम लोटन चौधरी, निंबा बापू चौधरी, गोकुळ पाटील, संतोष चौधरी
- ग्रामसेवक के. के. लंकेश
- मुख्याध्यापक संजय भोसले
- ज्येष्ठ शिक्षक डी. बी. पाटील, सी. एन. पाटील
तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी झाला. कार्यक्रमानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना जलेबी वाटप करून त्यांचे कौतुक केले.
