साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वक्त्यांची कार्यशाळा संपन्न..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – समाज सुधारक, साहित्यिक व लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान यंदाही मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वक्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डी. ए. पाटील होते, तर अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार विराजमान होते. डॉ. प्रा. राहुल निकम यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे प्रमुख बाबुराव ठाकरे यांनी केले.
शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. गायत्री भदाणे (माजी मुख्याध्यापिका, सावित्रीबाई फुले विद्यालय, अमळनेर) व सुनील महाजन (पोलीस विभागातील समाजसेवक, स्वेच्छानिवृत्त) यांचा सत्कार अनुक्रमे प्रा. उषा देवरे व निरंजन पेंढारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांनी महापुरुषांच्या विचार प्रचाराच्या अभियानात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
या कार्यशाळेत मिलिंद निकम, अजय भामरे, अरुण देशमुख, रियाज मौलाना, सुनील वाघमोडे, संजय सूर्यवंशी, ए. एन. घोलप, सुनील अहिरराव, पुरुषोत्तम माळी, चिंधू वानखेडे, अनिता संदान शिव, सुनिता मोरे, भारती कोळी, चेतन जाधव, शेख ताहेर भाई, उमाकांत ठाकूर यांसह अनेक मान्यवर वक्त्यांची उपस्थिती होती.
ही कार्यशाळा पिंपळे रोड, विठ्ठलनगर येथील अभ्यासिकेत संपन्न झाली.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 99200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1160/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
