अल-फलाह ट्रस्ट व रॉयल उर्दू हायस्कूलतर्फे बक्षिस वितरण सोहळा संपन्न..

0
New-Doc-07-21-2025-10.15.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – आज दि. 19 जुलै 2025 रोजी अल-फलाह ट्रस्ट आणि रॉयल उर्दू हायस्कूल यांच्या वतीने बक्षिस वितरणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची अध्यक्षता मा. दादासाहेब, आमदार अनिल दादा पाटील यांनी केली.

या प्रसंगी 10 वी, 12 वी तसेच मिशन यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच नूर-ए-खानदेश ट्रस्ट, मुंबई तर्फे गरजू महिलांना शिलाई मशीन व मुलांना नोटबुकचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमळनेरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये अखलाक सर (मुंबई), अब्दुल सत्तार मास्टर, हाजी शरीफ साहेब, राजू संदनशिव, हाजी शेखा साहेब, हाजी शरीफ इंजिनियर.हाजी शब्बीर पहलवान, रोटरी क्लब अध्यक्ष ताहा भाई बोहरी, मोना भाई, मुख्तार खाटिक साहेब, इमरान खाटिक, मुन्ना पत्रकार, डॉ. रईस बागवान, आबिद अली सय्यद, साबिर ठेकेदार, सईद तेली, जाकिर पठान, जुनैद शेख, अज़हर शेख, अशफाक पत्रकार, इमरान शेख, सैयद नबी, जुबेर पठान, शराफत ठेकेदार, मुस्तफा भाई व मुबारक भाई यांचा समावेश होता.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला असून उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या संस्थांचे कौतुक केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी अलफ्लाह ट्रस्टच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed