अखेर मंगरूळ येथे सन्मानाने भांडे वाटप; आमदार अनिल पाटील यांच्या लक्षामुळे कामगारांचे समाधान..

0
New-Doc-07-19-2025-06.24.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेअंतर्गत सुरू असलेल्या भांडे वाटप कार्यक्रमातील गोंधळ अखेर संपुष्टात आला आहे. मंगरूळ (ता. अमळनेर) येथे आमदार अनिल पाटील यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे काल शांततेत व सन्मानाने लाभार्थ्यांना भांडे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात मा. जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते जीवनोपयोगी भांड्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमावेळी स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सौ. जयश्री पाटील म्हणाल्या, “कामगार कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. त्यांचा प्रभावी अंमल ग्रामस्तरावर होण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. शासन कामगारांचे सशक्तीकरण आणि सामाजिक सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे, आणि त्याचा थेट लाभ कुटुंबांपर्यंत पोहोचवणे हाच आमचा हेतू आहे.”

भांडे वाटप शांततेत झाल्याने लाभार्थ्यांनी आमदार अनिल पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

दरम्यान, पुढे कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी एका दिवशी फक्त 250 लाभार्थ्यांना भांडे वाटप केले जाणार आहे. ज्यांची नावे यादीत असतील त्यांनीच उपस्थित राहावे, अन्य कोणीही येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1150/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed