बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्राची चोरी..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – बसमधील गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची घटना 17 जुलै रोजी घडली आहे.

उदयनगर येथील प्रतिभा राजेश वाघ (वय 39) या आपल्या मुलाला शिक्षणासाठी दररोज अमळनेर येथे सोडायला व घ्यायला जातात. 17 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्या आपल्या मुलाला सोबत घेऊन उदयनगर बसमध्ये चढत असताना मोठी गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर अचानक मंगळसूत्राची पोत तुटल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता सोन्याच्या दोन वाट्या (३ ग्रॅम, किंमत सुमारे १८ हजार रुपये) व सोन्याचे एक मणी (१ ग्रॅम, किंमत सुमारे ६ हजार रुपये) गायब असल्याचे दिसून आले.
प्रवाशांनीही शोध घेतला; मात्र मणी आणि वाट्या सापडल्या नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची खात्री झाल्याने वाघ यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास हेकॉ संतोष पवार करीत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1150/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
