पारोळा नगरपरिषदेच्या अवास्तव भाडे आकारणी व घरपट्टी प्रक्रियेस शासनाची स्थगिती..
पारोळा प्रतिनिधी

– पारोळा नगरपरिषदेकडून सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीसाठी सुरू असलेल्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी (घरपट्टी) प्रक्रियेस महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम १६९ नुसार करासंदर्भात अपील करण्यासाठी अपील समितीची तरतूद आहे. मात्र, पारोळा नगरपरिषदेमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असल्याने अपील समिती अस्तित्वात नाही.
तसेच, अधिनियमाच्या कलम १२४ (२) नुसार राज्य शासनास लोकहिताच्या दृष्टीने करपात्र मूल्याचे पुनरिक्षण करण्याचे अधिकार असून, त्या अनुषंगाने शासनाने नगरपरिषदेची निवडणूक होऊन नव्याने निवडून आलेले समिती सदस्य सुनावणी घेईपर्यंत ही कर आकारणी प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
ही स्थगिती लागू राहील, तोपर्यंत नागरिकांना अवास्तव भाडे आकारणी व घरपट्टीविषयी दिलासा मिळणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1150/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
