अमळनेरमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर – २० जुलै रोजी..
अमळनेर – मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाऊंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) आणि आर. झूणझूवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल, नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या रविवार, २० जुलै २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत, श्री मंगळग्रह मंदिर, चोपडा रोड, अमळनेर येथे होणार आहे.आवश्यक सूचना –
- शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांनी आधार कार्ड व रेशन कार्डाच्या झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.
- मधुमेह किंवा रक्त पातळ करण्याच्या गोळ्या घेत असतील तर त्या गोळ्या व डॉक्टरांची फाईल आणणे बंधनकारक आहे.
- शिबिराला उपाशीपोटी यावे (चहा व नाश्ता करू नये).
- ऑपरेशनसाठी निवड झाल्यास टिफिन व पांघरूण सोबत ठेवावे. त्याच दिवशी पनवेल येथे जाण्याची मोफत व्यवस्था केली जाईल.
- हॉस्पिटलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध असेल.
- कुटुंबातील कोणत्याही एकाचा मोबाईल नंबर नोंदवणे आवश्यक आहे.
- डोळ्यांशी संबंधित गंभीर समस्या असलेल्यांनीही शिबिराचा लाभ घ्यावा.
