अमळनेर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिमेंटचा त्रास; प्रवाशांच्या आरोग्यास धोका..

0
New-Doc-07-17-2025-21.11.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर : अमळनेर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाशांना सिमेंटमुळे त्रास सहन करावा लागत आहे. प्लॅटफॉर्मलगत उभी राहणारी सिमेंटने भरलेली मालगाडी येथून थेट ट्रकांमध्ये सिमेंट भरण्याची प्रक्रिया सुरू असते. या दरम्यान उडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनास त्रास होत असून लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर धोका निर्माण झाला आहे तसेच बसण्याच्या बाका सुधा सिमेंटने भरलेली असतात प्रवाशांचा श्वास घुटमळतो, डोळ्यांना त्रास होतो तसेच दीर्घकाळ या धुळीच्या संपर्कात राहिल्यास फुफ्फुसांच्या आजाराचा धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार नोंदवली असून, तत्काळ पर्यायी व्यवस्था करून प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, अशी मागणी केली जात आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed