आरोग्य निरीक्षकावर प्राणघातक हल्ला : हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी..
आबिद शेख/ अमळनेर
.

जामनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक श्री. विजय प्रभाकर सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेबाबत हल्लेखोरावर कठोर कारवाईची मागणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आली.

दि. १७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता गांधी चौकात अतिक्रमण विरोधी कारवाई करत असताना, विना परवाना फेरीवाले हटविण्यासाठी गेलेल्या पथकावर अतिक्रमणधारक दिपक पंढरी भोई याने शिवीगाळ करून हातगाडीस लावलेल्या छत्रीच्या लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात श्री. सपकाळे गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ व आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या योग्य कलमांखाली कठोर कारवाई व्हावी, यासाठी अमळनेर येथील कामगार संघटनेतर्फे जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांना निवेदन देण्यात आले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
