अमळनेरचा मानाचा तुरा! स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक

आबिद शेख/अमळनेर. १२,५०० पैकी तब्बल ९,००३ गुणांची कमाई करून अमळनेरने जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. गेल्या वर्षीही (स्वच्छ सर्वेक्षण २०२३) अमळनेरने याच स्थानावर बाजी मारली होती. या वर्षीच्या निकालानुसार –जिल्ह्यात – १ ला क्रमांक
५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात, नाशिक विभागात – ४ था क्रमांक
राज्यात – १७ वा क्रमांक
देशाच्या पातळीवर (५० हजार ते ३ लाख लोकसंख्या गटात) – ११० वा क्रमांक . प्रशासक व नागरिकांचे अभिनंदन. १७ जुलै २०२५ रोजी घोषित झालेल्या निकालानंतर प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी शहरातील नागरिक, नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागातील निरीक्षक व सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

गुणांची विभागणी अशी
🔹 हागणदारीमुक्त शहर (Open Defecation Free City) – १,०००/२,५०० गुण
🔹 कचरामुक्त शहर (Garbage Free City) – प्रमाणपत्र घटकांतर्गत गुणांकन
🔹 सिटिजन व्हॉइस – जनजागृती, नागरिकांचा सहभाग
🔹 सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस – १०,००० पैकी ८,००३ गुण. अमळनेर नगरपरिषद गेल्या काही वर्षांत स्वच्छतेच्या कामगिरीत सतत प्रगती करत आहे. नागरिकांनी स्वच्छतेची सवय अंगीकारावी व शहराच्या मानाचा तुरा उंचावण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
