भांड्यांच्या गोंधळावरून कामगारांचा रस्ता रोको; तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे.
आबिद शेख /अमळनेर

अमळनेर– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भांडी वाटप योजनेतील गोंधळामुळे शेकडो कामगारांना रिकाम्या हाताने परत जावे लागल्याने संतप्त कामगारांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला.

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनाने जीवनावश्यक भांडी वाटप योजना राबवली असली, तरी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये झालेल्या अडचणींमुळे कामगारांना लाभ मिळू शकला नाही. योजनेचे नियोजन ठेकेदारालाच नीट समजले नसल्याने तोही गैरहजर राहिला. परिणामी १५ जुलै रोजी होणारे भांडी वाटप रद्द झाले. स्थानिक प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना या गोंधळाची कल्पना नसल्याने ते कामगारांना मदत करू शकले नाहीत.
१६ जुलै रोजी भांडी वाटपासाठी शेकडो कामगार, विशेषत: महिलांचा मोठा जमाव प्रांत अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर जमला. मात्र तिथे कोणीही जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदार हजर नसल्याने संतापलेल्या कामगारांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कामगारांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. यावेळी माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी हस्तक्षेप करत तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना घटनास्थळी बोलावले. त्यांनी भांडी वाटप करणारे ठेकेदार ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.
ऑनलाईन प्रक्रियेतील अडचणी व नियोजनाच्या त्रुटीमुळे झालेला गोंधळ दूर करण्यासाठी १७ जुलैपासून केवायसी करून भांडी वाटप सुरू केले जाईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्ते शांत झाले व जमाव माघारी परतला.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
