एमआयडीसी परिसरातील बंद कंपन्यांमधील चोरी ४ तासांत उघडकीस : आरोपी ताब्यात..
24 प्राईम न्यूज 17 Jul 2025

जळगाव – एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील बंद असलेल्या कंपन्यांमध्ये झालेली 48,600 रुपयांची चोरी केवळ 4 तासांत उघडकीस आणत एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

दिनांक 13 जुलै रोजी व्ही सेक्टरमधील V-15 कंपनी व V-130 गौरी पॉलीमर्स कंपनीतून तांब्याच्या तारेचे 18,000 रुपयांचे 13 रिल, 5,600 रुपयांचे पॉलीकेब इलेक्ट्रिक वायरचे 7 बंडल व 25,000 रुपयांचे चटई मशीनचे स्पेअर पार्ट असा एकूण 48,600 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत एमआयडीसी पोस्टे येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पोउनि राहुल तायडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने नेत्रम योजनेअंतर्गत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात दोन महिला चोरी करताना व रिक्षातून चोरीचा माल नेताना दिसून आल्या. पुढील तपासातून रिक्षा व चालकाची ओळख पटवून इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या (रा. शाहू नगर, जळगाव) यास मालवाहू रिक्षासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून संपूर्ण चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. या कारवाईत पोउनि राहुल तायडे, पोहेकों गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोकों राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नितीन ठाकुर, तसेच नेत्रमचे पोलीस अंमलदार पोकों पंकज खडसे व मुबारक देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकों रामकृष्ण पाटील व पोकों नरेंद्र मोरे करीत आहेत.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1135/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
