टाकरखेडे गावाची शान! पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील यांचे भव्य स्वागत व सत्कार सोहळा..
आबिद शेख/अमळनेर

टाकरखेडे (ता.अमळनेर) : टाकरखेडे गावातील स्नेहल जगदीश पाटील हिची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झाल्यानंतर तिच्या प्रथम आगमनानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. दि. 13 जुलै 2025 रोजी टाकरखेडे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

याच पार्श्वभूमीवर दि. 14 जुलै 2025 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेत संपूर्ण गावातर्फे तिचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
स्नेहल पाटील यांच्या कुटुंबात देशसेवेचा वारसा आहे. तिचे वडील जगदीश प्रभाकर पाटील हे महाराष्ट्र पोलीस विभागात सहायक उपनिरीक्षक (ASI) पदावर कार्यरत आहेत. आजोबा प्रभाकर नारायण पाटील हे रेल्वे सुरक्षा बलात हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत. मोठे काका अरविंद प्रभाकर पाटील हे आर्मीमधून ऑर्डनरी कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत, तर लहान काका श्रीधर जगदीश पाटील हे सध्या बीएसएफमध्ये कार्यरत आहेत.
सत्कार प्रसंगी स्नेहल पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण करून कठोर परिश्रम व चिकाटीच्या बळावर आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1140/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
