महादेव मंदिरातील मुकुटसह दागिणे चोरणारे आरोपी ४८ तासांत गजाआड – एमआयडीसी पोलिसांची धमाकेदार कामगिरी..

0
New-Doc-07-15-2025-09.38.jpg

24 प्राईम न्यूज 15 Jul 2025

जळगाव : शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मुकुंदनगर लाठी शाळेजवळील मानेश्वर महादेव मंदिरातील ६१,५०० रुपयांचे चांदीचे मुकुट आणि दागिणे चोरणाऱ्या चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत गजाआड केले.

फिर्यादी अरुण लक्ष्मण शेटे हे कुटुंबासह पुण्यास मुलाकडे गेले असता, त्यांच्या घरी ठेवलेले महादेव मंदिराचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्र. ५०८/२०२५ भा.दं.वि. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे ११ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींचा पर्दाफाश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथक तयार केले. पोउनि चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप चौधरी, गिरीश पाटील, रतन गिते, गणेश ठाकेर, नितीन ठाकुर आणि राहुल घेटे यांनी घटनास्थळ परिसरातील तसेच चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवली अटक केलेले आरोपी
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. अटक आरोपी अशी आहेत :
1.शाकीब शेख ताजुद्दीन शेख (वय २४, रा. प्लॉट नं. १०, रोकडे कॉम्प्लेक्सजवळ,कासमवाडी, जळगाव)
2.राहुल शेखर रावळकर (वय ३२, रा. जाखनी नगर,कंजरवाडा,जळगाव)
त्यांच्याकडून चोरी गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठ पोलिसांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार पार पडली. पुढील तपास पोहेकॉ. गिरीश पाटील आणि पो.कॉ. योगेश घुगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed