अमळनेर नगरपरिषदेची तब्बल ₹७७.१० कोटी थकबाकी!कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा धक्कादायक खुलासा.
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अवाजवी करांविरोधात शहरात प्रचंड रोष व्यक्त होत आहे. अमळनेर पत्रकार संघाने पुढाकार घेत जनतेच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केले असून, याच पार्श्वभूमीवर मा. आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी नगरपरिषदेच्या थकबाकीचा धक्कादायक तपशील जाहीर केला आहे.

“निसर्ग हाच परमेश्वर” हा पर्यावरणपूरक संदेश देत पाटील यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, नगरपरिषदेवर तब्बल ₹७७.१० कोटींचे प्रलंबित थकबाकी व देयके आहेत.

थकबाकीचा तपशील
१) प्रलंबित थकबाकी देयके – ₹२७.०० कोटी
- शहरी पाणी पुरवठा व वीज बिल (2003-2016, 2022-2027) – ₹३९.९३ कोटी
- मुख्य कार्यालयीन इमारत व पथदिवे – ₹०८.२० कोटी
- बिगर सिंचन पाणीपट्टी (डिसेंबर 2024 पर्यंत) – ₹०३.९२ कोटी
- पाणी पुरवठा कर्ज थकबाकी – ₹०३.९२ कोटी
- कर्मचारी प्रलंबित देयके (अंदाजित) – ₹०८.७० कोटी
- जप्ती व न्यायालयीन प्रकरणे – ₹१३.९९ कोटी + व्याज (दरमहा 17%)
(जप्तीची शक्यता, न.प. प्रशासकीय इमारती लिलावाची भीती)
२) विकास प्रकल्पातील नगरपरिषदेचा हिस्सा – ₹३२.९८ कोटी
- रस्ते विकास प्रकल्प (नगरोत्थान महाअभियान) – ₹११.७० कोटी
- पाणी पुरवठा प्रकल्प (नगरोत्थान अभियान) – ₹२१.४८ कोटी
एकूण थकबाकी
✅ प्रलंबित थकबाकी: ₹२७.०० कोटी
✅ विकास प्रकल्पासाठी देयके: ₹३२.९८ कोटी
✅ एकूण रक्कम: ₹७७,१०,४१,३१०. न्यायालयीन कारवाईचा इशारा. या थकबाकीवरून दिवाणी न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असून, प्रशासकीय इमारती व व्यापारी संकुल जप्तीचा धोका निर्माण झाला आहे. रक्कम न भरल्यास जाहीर लिलावाची शक्यता असल्याचे समजते. पर्यावरणाचा संदेश कृषिभूषण पाटील यांनी या निमित्ताने नागरिकांना आवाहन केले की –
“वृक्ष वाढवा… पृथ्वी वाचवा… धन मिळवा…”
