कोळपिंप्रीत काटे परिवाराचा समाजभानाचा अनोखा उपक्रम! मातोश्री च्या स्मरणार्थ शिवशाही फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..
आबिद शेख/अमळनेर

कोळपिंप्री (ता. पारोळा) : समाजासाठी आपले ऋण फेडण्याची सध्या घडणारी उदाहरणे दुर्मीळ होत असताना, काटे परिवाराने एक सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. स्वर्गीय विमलबाई प्रतापराव काटे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) च्या वतीने कोळपिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच संजीव काटे होते. यावेळी वि.का. सोसायटीचे माजी चेअरमन गिरीश काटे, माजी सरपंच दत्तात्रय काटे, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जयेशकुमार काटे, सुरेश काटे, भगवान काटे, जुलाल काटे, प्रमोद काटे, महेंद्र सोनवणे, प्रकाश काटे, सचिव उमेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम चौधरी, शिक्षक सुनिल एम. काटे व ज्ञानेश्वर पाटील हेही उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. पूर्वजांच्या स्मृती जपताना त्यांचे समाजासाठी असलेले योगदान अशा स्वरूपात पुढील पिढीसमोर मांडणे ही काळाची गरज आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले.
या वेळी उमेश काटे यांनी प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन आत्माराम चौधरी यांनी केले.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98300/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90400/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74700/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1125/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
